Nitin Gadkari
esakal
नवी दिल्ली - ‘विकासाची भविष्यवेधी दृष्टी ही ‘नेशन फर्स्ट’ची पहिली संकल्पना आहे. इतिहास, संस्कृती आणि वारशाच्या जोरावर आम्ही विश्वगुरू बनण्याची क्षमता राखतो,’ असे प्रतिपादन आज केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी माजी केंद्रीय माहिती आयुक्त आणि ज्येष्ठ पत्रकार उदय माहुरकर यांच्या ‘माय आयडिया ऑफ नेशन फर्स्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना केले.