'कुलभूषण यांचे आरोग्य प्रमाणपत्र द्या' 

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

जाधव हे एक वर्षाहून अधिक काळपासून तुरुंगात आहेत. त्यांची भेटही घेऊ दिली जात नाही. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत भारत सरकारला आणि जाधव यांच्या कुटुंबीयांना प्रचंड काळजी आहे

नवी दिल्ली - माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचे आरोग्य प्रमाणपत्र देण्याची मागणी भारताने पाकिस्तानकडे केली असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने आज दिली.

कुलभूषण यांच्या प्रकृतीबाबत आणि ते सुरक्षित असण्याबाबत भारताला काळजी असल्याने ही मागणी करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी सांगितले. जाधव यांना पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपांतर्गत अटक केली आहे.

"जाधव हे एक वर्षाहून अधिक काळपासून तुरुंगात आहेत. त्यांची भेटही घेऊ दिली जात नाही. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत भारत सरकारला आणि जाधव यांच्या कुटुंबीयांना प्रचंड काळजी आहे,'' असे बागले यांनी सांगितले. भारत सरकारतर्फे पाकिस्तानमधील भारताचे उच्चायुक्त गौतम बंबावाले यांनी पाकिस्तान सरकारकडे ही मागणी केली आहे. 

Web Title: India asks Pak for certificate on Jadhav's health condition