भारत - बांगलादेश यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा

वृत्तसंस्था
सोमवार, 5 डिसेंबर 2016

नवी दिल्ली- भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान गृहसचिव पातळीवरील दोनदिवसीय चर्चा आजपासून (सोमवार) राजधानी दिल्लीमध्ये सुरू होत आहे.

सुरक्षा, सीमेवरील प्रश्न आणि इतर द्विपक्षीय मुद्द्यांवर या दोन दिवसांमध्ये चर्चा होणार आहे. दहशतवादाच्या विरोधात सहकार्य आणि गोपनीय माहितीची देवाणघेवाण यावरही निर्णय होणे अपेक्षित आहे. 

केंद्रीय गृह खात्याचे सचिव राजीव महर्षी, त्यांचे बांगलादेशातील समपदस्थ मोझम्मील हक खान आणि दोघांचे सहकारी यांच्यात गहन चर्चा होणार आहे. बांगलादेशसोबत अशा प्रकारची चर्चा एक वर्षापूर्वी म्हणजे नोव्हेंबर 2015 मध्ये ढाका येथे पार पडली होती. 
 
Web Title: India, Bangladesh Home Secretary level talks from today