Rahul Gandhi Protest Delhi
esakal
निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत INDIA आघाडीच्या १४० हून अधिक खासदारांनी मंगळवारी संसद भवनापासून निवडणूक सदनाकडे मोर्चा काढला होता. मात्र, दिल्ली पोलिसांनी आकाशवाणी भवन आणि नीती आयोगाच्या परिसरात बॅरिकेडिंग करत मोर्चा अडवला आहे. यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक विरोधी खासदारांनी तिथेच धरणा आंदोलन सुरू केलं आहे.