

INDIA Bloc: मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजाशी संबंधित प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीपूर्वी राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी एक नवीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जाद्वारे याचिकाकर्त्यांनी निवडणूक आयोगाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, दोन्ही निवडणूक आयुक्त आणि आयोगाच्या आयटी महासंचालकांना ४८ प्रश्न विचारण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाकडे मागितली आहे.