
पंतप्रधान मोदींचे वक्तव्य आणि सेना प्रमुख, संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांनी केलेल्या वक्तव्यांमध्ये विरोधाभास दिसून येत आहे.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन या दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. देशभरात चीनविरोधात संतापाची लाट उसळली असून अनेकांनी चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला आहे. तर काहींनी चीनी वस्तूंची होळी करत आत्मनिर्भर भारत आणि देशी वस्तूंचा वापर करण्याचा संकल्प सोडला आहे.
- राज्यसभेसाठी मतदान केलेले भाजपचे 'ते' आमदार कोरोना पॉझिटिव्ह
एकीकडे हे वातावरण निर्माण झाले असताना माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, शक्य तितक्या लवकर आपण आत्मनिर्भर व्हायचा प्रयत्न केला पाहिजे, मात्र हे करत असताना इतर देशांसोबतचे संबंध आपण तोडू शकत नाही. चीनबरोबर जे व्यापारी संबंध आहेत ते आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक भाग आहे. त्यामुळे चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकून चीनला काही नुकसान होणार नाही. मात्र, जेव्हा मुद्दा सुरक्षेचा येतो, तेव्हा बहिष्कारासारख्या गोष्टींना यामध्ये नाही आणलं पाहिजे.
- मोठी बातमी : भारताची विमानं देणार चीनला प्रत्युत्तर
दरम्यान, सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणीही भारतीय भूभागावर कब्जा केल्या नसल्याचे म्हटले. मात्र, यावर काँग्रेस नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पंतप्रधान मोदींचे वक्तव्य आणि सेना प्रमुख, संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांनी केलेल्या वक्तव्यांमध्ये विरोधाभास दिसून येत आहे. जर चीनी सैनिकांनी सीमा ओलांडली नसेल तर ५ आणि ६ मे रोजी भारतीय सीमेवर सैनिकांमध्ये तणाव निर्माण झाला होता? त्यानंतर बरोबर एक महिन्याने ५ आणि ६ जूनला दोन्ही देशांच्या कमांडर अधिकाऱ्यांनी बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली? असा सवालही चिदंबरम यांनी उपस्थित केला.
- चोर तो चोर आणि वर शिरजोर; चीनचा भारतावर मोठा आरोप
चिदंबरम यांच्यासोबतच काँग्रेसच्या इतर नेत्यांनी लडाख मुद्द्यावरून मोदी सरकारला घेरले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आज पुन्हा सरकारला प्रश्न विचारले आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांनी भारतीय जवानांनी खूप मोठा पराक्रम केला आहे. बिहार रेजिमेंटच्या जवानांवर प्रत्येक बिहारीला गर्व आहे, असे म्हटले आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
So boycotting Chinese goods will not hurt the China's economy. We should not bring issues like boycott when we are discussing very grave matters like the defence of India: Congress leader P Chidambaram (2/2) https://t.co/S1kVyP269J
— ANI (@ANI) June 20, 2020