चोर तो चोर आणि वर शिरजोर; चीनचा भारतावर मोठा आरोप

Modi-Jinping
Modi-Jinping

नवी दिल्ली - सीमेवरील हिंसक तणावानंतर भारतात चीनविरुद्ध लष्करी कारवाईबरोबरच आर्थिक बहिष्काराच्या मागणीनेही जोर धरला आहे. मात्र चिनी आक्रमकतेला मुरड बसलेली नसून, गलवान खोऱ्यात जे काही घडले, त्याला सर्वस्वी भारतच जबाबदार आहे, असा कांगावाही चीनने सुरूच ठेवला आहे. गलवान खोऱ्यात ताबा रेषेवर चिनी सैनिकांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात २० भारतीय जवानांनी हौतात्म्य पत्करले. चीनच्या या कृत्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली असून, चीनला धडा शिकविण्यासाठी, चिनी मालावर बहिष्कारासाठी निदर्शने, आंदोलन सुरू झाले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनची भारतीय हद्दीतील घुसखोरी आणि सैन्यतयारी या वादास कारणीभूत असून, उभय पक्षांच्या झालेल्या सहमतीचे उल्लंघन करण्याचा आणि यथास्थिती उधळून लावण्याचा चिनी कावा यामागे असल्याचे भारताचे ठाम म्हणणे आहे. परंतु, चीनकडून आक्रमक विधाने सुरूच आहेत. चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी गलावन खोऱ्यात झालेल्या हिंसेचे खापर भारतावर फोडले. कोण चूक आणि कोण बरोबर हे स्पष्ट असून गलवानमध्ये जे काही घडले त्याची संपूर्ण जबाबदारी भारताची आहे, असा कांगावा चिनी प्रवक्त्याने केला. भारतीय सैनिकांच्या प्रत्युत्तरात ४३ चिनी सैनिक ठार झाले. मात्र चिनी लष्कर आणि चिनी अधिकारी या मुद्द्यावर मौन आहेत. 

दहा जवानांना सोडले? 
गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षात भारताच्या दहा जवानांना चीनने ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली होती. मात्र आपला एकही सैनिक बेपत्ता नाही, असेच भारतीय लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यापार्श्वभूमीवर चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनीही, कोणत्याही भारतीय जवानाला चिनी सैन्याने ताब्यात घेतले नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच, तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीनमध्ये संवादप्रक्रिया सुरू असल्याचे चिनी प्रवक्त्याचे म्हणणे असले, तरी आज दोन्ही देशांची लष्करी अथवा राजनैतिक पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे कळते. चीनने मुक्त केलेल्या १० जवानांमध्ये दोन मेजर पदावरील अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. काल त्यांची मुक्तता करण्यात आल्याची माहिती समोर आली. दोन्ही देशांमध्ये मेजर जनरल पातळीवर झालेल्या चर्चेनंतर या दहा जवानांना सोडण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी सरकारी पातळीवरून या माहितीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com