esakal | भारत इस्राईलकडून खरेदी करणार 'अवास्क'; पाक आणि चीनवर ठेवणार करडी नजर
sakal

बोलून बातमी शोधा

AWACS

भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या वादामुळे दोन्ही देशातील संबंध ताणलेले आहेत. इकडं जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानसोबतही तीच स्थिती आहे. या पार्श्वभूमीवरच आता जर हा वाद वाढला तर आपणही सज्ज असावं म्हणून भारत तयारी करताना दिसत आहे. कारण जर युध्द झालं तर भारताला दोन्ही आघाडीवर लढावं लागेल. यामुळे आता भारतीय संरक्षण मंत्रालय इस्त्राईलसोबतच्या कराराला अंतिम रूप देऊ शकतं.

भारत इस्राईलकडून खरेदी करणार 'अवास्क'; पाक आणि चीनवर ठेवणार करडी नजर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या वादामुळे दोन्ही देशातील संबंध ताणलेले आहेत. इकडं जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानसोबतही तीच स्थिती आहे. या पार्श्वभूमीवरच आता जर हा वाद वाढला तर आपणही सज्ज असावं म्हणून भारत तयारी करताना दिसत आहे. कारण जर युध्द झालं तर भारताला दोन्ही आघाडीवर लढावं लागेल. यामुळे आता भारतीय संरक्षण मंत्रालय इस्त्राईलसोबतच्या कराराला अंतिम रूप देऊ शकतं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारत इस्त्राईलकडून खरेदी करणार 'अवाक्स'
या कराराअंतर्गत भारत ईस्त्राईलकडून दोन 'फाल्कन एयरबॉर्न वॉर्निग एंड कंट्रोल सिस्टम (अवाक्स)' मिळणार आहेत. याअगोदरही भारताची अवाक्सच्या व्यवहाराबद्दल चर्चा झाली होती.  बऱ्याचदा या चर्चा किंमतीवरून फिसकटल्या होत्या. पण आता शेजारील देशांसोबत वाढलेला तणाव पाहता  भारताला  हा व्यवहार लवकरात लवकर करावा लागेल, असं सांगितलं जात आहे.

मराठा आरक्षणाबाबत पुढील सुनावणी होणार या दिवशी

कराराला लवकरच मिळू शकते मान्यता
इस्त्राईली फाल्कन अवाक्स रशियाच्या 'इल्यूसिन-76 हैवी लिफ्ट एयरक्राफ्ट'मध्ये बसविण्यात येणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या मंत्रालयीन समितीमध्ये या करारावर चर्चा झाली असून आणि लवकरच अंतिम मंजुरीसाठी मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समिती समितीसमोर सादर केले जाईल.

बाँबस्फोटाच्या कटातील आरोपींना ११ वर्षांनंतर सुनावली शिक्षा

भारताकडे आधीपासूनच तीन फाल्कन अवाक्स-
भारतीय वायु सेनाकडे याआधीच तीन फाल्कन कार्यरत आहेत. ही  फाल्कन अवेक्स 2009-2011 दरम्यान भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आली आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलकडून खरेदी करण्यासाठी ज्या दोन अवाक्सची चर्चा चालू आहे,  त्या आधीच्या तीन फाल्कनपेक्षा अधिक सामर्थ्यवान असतील. 

शालेय अभ्यासक्रमात या राज्याने केली ३० टक्के कपात

सध्या भारताने लडाखसारख्या उंच भागात चीनच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी हलक्या वजनाचे टँकची निवडले आहेत. भारत आणि चीनच्या सीमेवर चीनने याआधीच त्यांच्या 'लाइटवेट टाइप -15  (झेडटीक्यू -15)' टॅंक तैनात केली आहे. आता भारत रशिकडून 2S25 Sprut-SD (एस 25 स्प्रूट-एसडी) टॅंक खरेदी करण्याच्या विचारात दिसत आहे. या टँकमध्ये 125 मिमी बंदूक आहे आणि हेवी लिफ्ट हेलिकॉप्टरद्वारे उंच भागात देखील तैनात केले जाऊ शकते.