कोरोना उठलाय जिवावर; देशात इतर रुग्णांकडं दुर्लक्ष, रोज 1300 जणांचा होतोय मृत्यू

cancer patients are being ignored dying more than covid 19
cancer patients are being ignored dying more than covid 19

नवी दिल्ली : कोरोनानं संपूर्ण जगाला मोठा धक्का दिलाय. कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न जगभरातील शास्त्रज्ञ करत आहेत. परंतु, त्यांना अजून म्हणावे तसे यश आलेले नाही. कोरोनाशी हा लढा सुरू असतानाच, कोरोनामुळं इतर रुग्णांकडं दुर्लक्ष होऊ लागलंय. परिणामी देशात दुसऱ्या एका रोगाचे रोज 1300 बळी जाऊ लागले आहेत. हा रोग म्हणजे कॅन्सर.

देशभरातील इतर महत्त्वाच्या घडामोडींसाठी येथे क्लिक करा

काय घडतंय?
मुळात कॅन्सरचा इलाज काही ठराविक टप्प्यातच होऊ शकतो. पण, कॅन्सरग्रस्त रुग्णाला योग्य उपचार मिळाल्यास त्याचा जीव वाचवणे शक्य असल्याचं अनेक उदाहरणांमधून पहायला मिळते. सध्या देशभरात विशेषतः महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्या रुग्णांची वाढती संख्या धडकी भरवणारी आहे. या रुग्णांना हॉस्पिटल्समध्ये बेड मिळत नसल्याचं चित्र आहे. त्यातच अनेक शहरांमध्ये कोरोना रुग्णांसाठी बेड शिल्लक ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कॅन्सरसारख्या रोगाशी झुंजणाऱ्या पेशंट्सकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी कॅन्सर पेशंटना उपचारांसाठी धावाधाव करावी लागत आहे. देशातील कॅन्सर रजिस्टर प्रोग्रामनुसार रोज 1300 कॅन्सरग्रस्त रुग्णांचा बळी जात आहे. दिल्लीत मोठ्या प्रमाणावर कॅन्सरग्रस्त पेशंट उपचारांसाठी येत असतात. एम्स, सफदरजंग, एलएनजेपी, राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट अशा अनेक सेंटर्समध्ये मोठ्या प्रमाणावर कॅन्सर पेशंट उपचार घेत आहेत. पण, देशात अनेक ठिकाणी कॅन्सर ग्रस्त रुग्णांवर उपचार होताना अडथळे येत आहेत. 

कोरोनाचा मृत्यू दर किती?
या संदर्भात आरोग्य क्षेत्रात सामाजिक काम करणारे, अशोक अगरवाल यांनी न्यूज18 ला विशेष मुलाखत दिली आहे. त्यात अगरवाल यांनी म्हटलंय की, कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या उपचारांबाबत हेळसांड होताना दिसत आहे. कॅन्सरग्रस्त पेशंट्ससाठी कोणतिही विशेष व्यवस्था नाही. देशात 2012 ते 2014 कॅन्सरग्रस्तांचा मृत्यू दर 6 टक्क्यांवर होता. लॉकडाउनच्या काळात उपचार न मिळाल्याने हा मृत्यू वाढत असल्याचे दिसत आहे. सध्या कोरोनाचं संकट गहिरं असलं तरी, देशातील कोरोनाचा मृत्यू दर केवळ 3 टक्के आहे. अर्थातच कॅन्सरचा मृत्यू दर कोरोनापेक्षा जास्त आहे. दरम्यान, देशात लॉकडाउनच्या काळात अपघातांचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळं अपघाती मृत्यूंच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com