मोदी सरकारच्या चुकांमुळे चीनला बळ मिळालं; राहुल गांधींनी डागली तोफ

Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा चीनच्या मुद्यावरुन मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधलाय. पत (Modi's Economic Policy) आणि परराष्ट्र धोरणावरुन (Modi's Foreign Policy) त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून मोदी सरकारवर तोफ डागली आहे. भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले आहे. चीनने नेमकी हीच वेळ का निवडली? असा प्रश्न उपस्थितीत करत राहुल गांधींनी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचून दाखवण्याचा प्रयत्न व्हिडिओच्या माध्यमातून केलाय. मोदी सरकारवर तोफ डागताना राहुल गांधींनी म्हटलंय की, सध्याच्या घडीला अशी कोणती परिस्थिती निर्माण झालीय ज्यामुळे चीनने भारताविरोधात आक्रमक होण्याचे धाडस दाखवले? असा प्रश्न राहुल गांधींनी या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थितीत केलाय. 

चीनने कुरघोडी करण्याचं धाडस कसं केलं? हे समजून घेण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या मुद्यांचा विचार करावा लागेल. त्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.  देशाची सुरक्षा ही एका बिंदूवर अवलंबून नसते. अनेक घटकाचा यावर प्रभाव असतो. देशातील पराराष्ट्र धोरण, देशाच्या सुरक्षिततेसंदर्भातील आर्थिक तरतूदी हे सर्व घटक यात अंतर्भूत असतात. मोदी सरकारच्या धोरणामुळे मागील सहा वर्षांत वेगवेगळ्या क्षेत्रांत संकटजन्य परिस्थिती निर्माण झाली. देशातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे, मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे चीनला बळ मिळाले आहे, असे सांगत राहुल गांधींनी मोदीं सरकारवर तोफ डागली.  

राहुल गांधी म्हणाले की, अर्थव्यवस्था ही आपली ताकत होती. पण सध्याच्या घडीला अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट झाली आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून छोटे व्यापारीही संकटात आहेत. सरकार या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे. मोदी सरकारच्या धोरणामुळेच चीन कुरघोडी करत आहे. या सर्वाला मोदी सरकार जबाबदार आहे, असा आरोप राहुल गांधींनी केलाय. लडाख सीमारेषेवर भारत आणि चीन यांच्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. याच मुद्यावरुन राहुल गांधींनी मोदी सरकारच्या  देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणाच्या कार्यक्षमतेकडे बोट दाखवले आहे.     


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com