पोखरण 1974 : इंदिरा गांधींचा 'स्माईलिंग बुद्धा' हा कोड नेमका काय होता?

अणूबॉम्ब 197 मीटर जमीनीत ठेवण्यात आला होता.
pokhran test 1974 indira gandhi
pokhran test 1974 indira gandhiE sakal

भारताने ४८ वर्षांपूर्वी १८ मे १९७४ साली भारताने पोखरण येथे पहिली अणूचाचणी घेतली होती. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी याला 'स्माईलिंग बुद्धा' म्हणजेच बुद्ध हसले असं म्हणाल्या होत्या, हा कोडवर्ड होता. जागतिक शांततेसाठी भारताचं पाऊल असं मत इंदिरा गांधींनी व्यक्त केलं होतं. ज्या दिवशी पोखरण अणूचाचणी झाली तो बुद्धपौर्णिमेचा दिवस होता.

राजस्थानमधील जैसलमेरजवळ लोहारकी गावात ही अणुचाचणी घेण्यात आली होती. या अणुचाचणीवेळी खूप गोपनीयता राखण्यात आली होती. अगदी संरक्षणमंत्र्यांना देखील या चाचणीची कल्पना देण्यात आली नव्हती..

पंतप्रधान इंदिरा गांधी स्वत: या अणुचाचणीवर बारीक लक्ष ठेवून होत्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं वर्चस्व यानंतर वाढलं आणि अणवस्त्र सज्ज देशांच्या पंगतीत भारताने स्थान मिळवलं. भारत हा जगातील ६ वा अणवस्त्रधारी देश ठरला होता. यापूर्वी अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन या ६ देशांकडेच अणवस्त्र होते. खरतर १९४४ साली अणूप्रकल्पाची सुरुवात झाली. होमी भाभा यांनी १९४४ साली टाटा इन्स्टीट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चची स्थापना केली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंनी अणूप्रकल्पाला अणि अणवस्त्रांच्या निर्मितीला परवानगी दिली होती. 1954 ते 1959 पर्यंत भाभांच्या देखरेखीखाली अणुप्रकल्पाचं काम सुरु होतं. पुढे त्यांच्या विमानअपघातातील मृत्यूनंतर भौतिकशास्त्रज्ञ राजा रमणणा यांच्या नेतृत्वात अणूबॉम्बच्या निर्मितीचा प्रकल्प सुरु राहिला.

लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाल्यानंतर भौतिकशास्त्रज्ञ विक्रम साराभाई अणूप्रकल्पाचे प्रमुख झाले. सप्टेंबर १९७२ साली इंदिरा गांधींनी अणूबॉम्ब निर्मितीसाठी 'भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर' ला मान्यता दिली. १९७४ साली भारतीय आर्मीच्या प्रमुखांना याविषयी पूर्ण माहिती देण्यात येत होती. पंतप्रधान वगळता केवळ त्यांच्या सल्लागारांना या अणूचाचणीची माहिती देण्यात आली होती. एकूण ७५ शास्त्रज्ञ या प्रकल्पाशी जोडले गेले होते. अणूचाचणीसाठी राजस्थानच्या पोखरण वाळवंटी भागाची निवड करण्यात आली होती. अणूबॉम्ब 197 मीटर जमीनीत ठेवण्यात आला होता. अणूचाचणी झाली तेव्हा मोठा स्फोट झाला होता, तर रेतीचा पर्वत आणि आगीचा लोळ दिसत होता. नागरिकही घाबरले होते. ही अणूचाचणी हे इंदिरा गांधींनी रेडीओवरुन देशाला संबोधित करताना सांगितले होते. तसंच भारताची शांततेची भूमिका मांडली होती.

1998 साली पंतप्रधान अटलबिहारी वाजपेंयींच्या काळात भारताने दुसरी अणूचाचणी केली होती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com