India:सीबीआयचे १४ राज्यांमध्ये छापे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीबीआयचे १४ राज्यांमध्ये छापे
सीबीआयचे १४ राज्यांमध्ये छापे

सीबीआयचे १४ राज्यांमध्ये छापे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण संस्थेने (सीबीआय) देशातील १४ राज्यांत ७६ ठिकाणी मंगळवारी छापे टाकले. महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, ओडिशा, तमिळनाडू, राजस्थान आदी राज्यांचा यात समावेश आहे. मुलांविरुद्ध लैंगिक गुन्हे करणाऱ्या व इंटरनेटवर यासंदर्भातील आक्षेपार्ह साहित्य पोस्ट करणाऱ्या ८३ जणांवर सीबीआयने कारवाई केली. याप्रकरणी या सर्वांविरुद्ध रविवारी (ता.१४) सीबीआयने गुन्हा नोंदविला. मध्य प्रदेशातील तीन शहरांतही छापे टाकण्यात आले.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) माहितीनुसार देशभरात मुलांविरुद्धच्या सायबर क्राईममध्ये २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये ४०० टक्के वाढ झाली. यात प्रामुख्याने मुलांविषयी लैंगिक साहित्य प्रसारित करण्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश यू.यू.ललित यांनीही केवळ बाल तस्करी व बाल शोषणावर लक्ष देण्याऐवजी चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित गुन्ह्यावरही लक्ष देण्याची गरज व्यक्त केली होती.

हेही वाचा: अमरावती : जाळपोळ व तोडफोडीच्या घटनांमध्ये जवळपास ४० लाखांचे नुकसान

उत्तर प्रदेशात सर्वाधिक गुन्हे
राज्य
गुन्ह्यांची नोंद
उत्तर प्रदेश
१६१
महाराष्ट्र
१२३
कर्नाटक
१२२
केरळ
१०१
ओडिशा
७१
तमिळनाडू
२८
आसाम
२१
मध्य प्रदेश
२०
हिमाचल प्रदेश
१७

loading image
go to top