चीनी सैनिकांकडून जवानांच्या मृतदेहाची विटंबना...

ladakh
ladakh

लडाख: भारत-चीन सीमेवर असलेल्या गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये 20 जवान हुतात्मा झाले असून, चीनी सैनिकांनी काही जवानांच्या मृतदेहाची विटंबना केल्याची माहिती पुढे आली आहे. हुतात्मा झालेल्या जवानांचे मृतदेह हे छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले आहेत.

चीनी सैनिकांविरोधात आपल्या जवानांच्या सहकाऱ्यांमध्ये चीड निर्माण झाली आहे. या सर्व प्रकारामुळे सध्या गलवान खोऱ्यातील बटालियनमध्ये रोषाचे वातावरण आहे. हुतात्मा जवानांचे सहकारी भडकले असून, गलवान खोऱ्यातील पेट्रोलिंग पॉईंट 14 मध्ये सध्या रोषाचे वातावरण आहे. लेहचे कमांडर गलवान खोऱ्यातील कमांडरसोबत संपर्कात असून, प्रत्येक तासाला तेथील परिस्थितीची माहिती घेतली जात आहे. लडाखमध्ये सीमेलगत असलेली गावे रिकामी करण्याची तयारी सुरू झाली आहे. लष्कराकडून गावकर्‍यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. देमचोक व पँगाँग परिसरातील वस्त्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. याशिवाय सीमेलगतच्या भागांमध्ये दुरध्वनी सेवा बंद केली आहे. केवळ ऑपरेशनशी निगडीत फोन सुरू असणार आहेत.

भारतीय लष्कराने लेह व अन्य सीमावर्ती भागात हालचाली वाढवल्या आहेत. त्याचबरोबर लडाखमधून जे काही लष्करी युनिट माघारी येणार होते, त्यांना त्या ठिकाणीच थांबण्यास सांगण्यात आले आहे. शिवाय, लडाखच्या आसपास असलेल्या परिसरात तैनात असलेल्या लष्करी युनिट्सला लेहमध्ये कधीही पोहचण्यास सज्ज राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com