जवान हुतात्मा झाल्याचा फोन आला; पण तसं नाही...

वृत्तसंस्था
Wednesday, 17 June 2020

भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीत जवान सुनील कुमार हुतात्मा झाल्याचा फोन कुटुंबियांना आला. यानंतर कुटुंबाने हंबरडा फोडला. पण, दुसऱया दिवशी सुनीलचा फोन आला आवाज ऐकून कुटुंब आनंदात बुडून गेले.

पाटना (बिहार) : भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीत जवान सुनील कुमार हुतात्मा झाल्याचा फोन कुटुंबियांना आला. यानंतर कुटुंबाने हंबरडा फोडला. पण, दुसऱया दिवशी सुनीलचा फोन आला आवाज ऐकून कुटुंब आनंदात बुडून गेले. दोन जवानांची एकसारखी नावे असल्यामुळे ही गफलत झाल्याचे लक्षात आले.

घरात लग्नाची तयारी सुरू असताना आलं वीरमरण...

चीन सीमेवर सुनील कुमार हुतात्मा झाला, अशी माहिती देणारा फोन त्यांच्या कुटुंबियांना आला. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाने हंबरडा फोडला. परिसरातील नागरिक सांत्वनासाठी जमा झाले होते. घरामध्ये मोठा गोंधळ सुरू होता. पण, दुसऱ्याच दिवशी सुनीलचा त्याच्या पत्नीला फोन आला. सुनिलचा फोनवरील आवाज ऐकताच कुटुंबातलं वातावरणच बदलून गेले. आम्हाला जी माहिती देण्यात आली होती ती चुकीची होती. एकाच नावाचे दोन जवान असल्यामुळे गडबड झाली, अशीमाहिती सुनीलची पत्नी मेनका यांनी दिली.

जवानांचे 'अद्भूत ट्रेनिंग'; व्हिडिओ व्हायरल...

दरम्यान, भारत-चीन सीमारेषेवर गलवान खोऱ्यात सोमवारी झालेल्या संघर्षामध्ये 20 जवान हुतात्मा झाले असून, चीन सैन्याच्या कमांडिंग ऑफिसरसह 43 जणांचा मृत्यू झाला आहे. लडाख भागातील पेनगॉंग सो येथे 5 मे पासून वाद सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india china border issue one soldier of bihar name confusion family in worried but soldier called his wife