जवानांचे 'अद्भूत ट्रेनिंग'; व्हिडिओ व्हायरल...

वृत्तसंस्था
Wednesday, 17 June 2020

जवानांच्या ट्रेनिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारण, जवानांचे गाण्याच्या तालावर ट्रेनिंग सुरू असल्याचे पाहायला मिळते. राहुल श्रीवास्तव यांनी संबंधित व्हिडिओ ट्विट केला आहे.

हैदराबाद: जवानांच्या ट्रेनिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारण, जवानांचे गाण्याच्या तालावर ट्रेनिंग सुरू असल्याचे पाहायला मिळते. राहुल श्रीवास्तव यांनी संबंधित व्हिडिओ ट्विट केला आहे.

पाक पोलिसांनी घाणेरडे पाणी पाजले; रॉडने मारले...

श्रीवास्तव यांनी व्हिडिओ ट्विट करताना त्याला 'अद्भूत ट्रेनिंग' असे शीर्षक दिले आहे. संबंधित व्हिडिओमध्ये सैन्याची एक तुकडी सराव करत असताना प्रशिक्षक हसत, जमिनीवर काठी मारत त्यांना गाण्याच्या तालावर प्रशिक्षण करण्यास सांगत आहेत. मोहम्मद रफी असे प्रशिक्षकाचे नाव आहे. व्हिडिओ व्हायरल होऊ लागल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले असून, मनोरंजन ट्रेनिंग असल्याचे नेटिझन्स म्हणतात.

दरम्यान, भारतीय जवानांचा सराव हा खडतर समजला जातो. प्रशिक्षण कालावधीत खडतर सराव केल्यानंतर जवान हे परिपूर्ण होतात आणि दुष्मनाशी दोन हात करण्यास सज्ज होताना दिसतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: telangana police training on music live video viral