इंच इंच लढू; पंतप्रधान मोदींची सर्वपक्षीय बैठकीत ग्वाही, चीनला इशारा

टीम ई-सकाळ
Friday, 19 June 2020

आपली सुरक्षा दलांकडून देशाच्या संरक्षणासाठी जी पावलं उचलणं अपेक्षित आहे, ती योग्य पद्धतीनं उचलली जात आहेत. चीनच्या सैनिकांनी भारतीय भूभागात प्रवेश केलेला नाही आणि त्यांनी आपली कोणतिही चौकी काबीज केलेली नाही.

नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवून सीमेवरील स्थितीची माहिती दिली. चीनने प्रत्यक्ष ताबा रेषेवर केलेल्या कृत्यामुळं संपूर्ण देश दुखावला आहे, असं सांगताना, चीनने भारतीय भूभागात प्रवेश केलेला नाही, असं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलंय. बैठकीला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह देशातील प्रमुख नेते उपस्थित होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक झाली.

देशभरातील बातम्यांसाठी येथे क्लिक करा

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'आपली सुरक्षा दलांकडून देशाच्या संरक्षणासाठी जी पावलं उचलणं अपेक्षित आहे, ती योग्य पद्धतीनं उचलली जात आहेत. चीनच्या सैनिकांनी भारतीय भूभागात प्रवेश केलेला नाही आणि त्यांनी आपली कोणतिही चौकी काबीज केलेली नाही. आपले 20 जवान हुतात्मा झाले आहेत. पण, ज्यांनी भारत मातेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्यांना योग्य प्रत्युत्तर देण्यात आलंय.' या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथसिंह देखील उपस्थित होते. सीमेवरची घटना हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला. 

आणखी वाचा - 'तर, आरएसएसच्या लोकांना सीमेवर पाठवा'

सीमेवरील तणावाच्या आणि घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी गप्प का?, असा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला होता. त्यानंतर आज, पंतप्रधान मोदींनी आज, सर्वपक्षीय बैठक बोलवून त्यावर स्पष्टीकरण दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india china issue pm narendra modi statement all party meeting