...तर आरएसएसच्या लोकांनाच सीमेवर पाठवा: हुसेन दलवाई

how can you send our soldiers without arms says husain dalwai
how can you send our soldiers without arms says husain dalwai

नवी दिल्ली: भारत-चीन सीमेवरील सैनिकांच्या हातात काठी द्यायला ती काय आरएसएसची शाखा आहे का? मग तिथे सैनिकांना का पाठवतात, आरएसएसच्या लोकांना तिथे पाठवा काठी घेऊन, ते सीमेची सुरक्षा करतील, असे काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे.

पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात 20 भारतीय जवान हुतात्मा झाले तर चीनचे 40 हून अधिक मारले गेले आहेत. यानंतर  दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. देशभरातील विविध पक्षाचे प्रमुख या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. मात्र, त्या अगोदर भारतीय जवान हुतात्मा झाल्याच्या मुद्यावरून हुसेन दलवाई यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

हुसेन दलवाई म्हणाले, 'पंतप्रधानांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, ती चांगली गोष्ट आहे. परंतु ही बैठक फार उशीरा होत आहे. ही बैठक अगोदरच व्हायला हवी होती. घुसखोरी किती प्रमाणात झाली आहे, याची माहिती संपूर्णपणे मिळणे आवश्यक आहे. यामध्ये देशाला विश्वासात घेणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, एक गोष्टी ही देखील आहे की, ते मोठ्याप्रमाणावर आतमध्ये आले आहेत. सीमेवर आपले 20 जवान हुतात्मा झाले आहेत आणि ते निशस्त्र गेले होते. चीनचे सैनिक देखील निशस्त्र आले होते, असे सांगितले जात आहे. पण, ते खिळे व लोखंड बसवलेल्या काठ्या घेवून आले होते. त्या काठ्यांनी त्यांनी मारहाण केली. त्यांचा एकही सैनिक मारला गेला नाही, आपलेच जवान हुतात्मा झाले आहेत. शिवाय, अनेकजण जखमी झाले. पण, आपण आपल्या सैनिकांना निशस्त्रपणे कसे काय पाठवले? जर ते लढले असते व काही झाले असते तर मी समजू शकतो. परंतु, त्यांना लढण्याची संधीच मिळाली नाही. तुम्ही त्यांच्या हातात काठी देता, ती काय आरएसएसची शाखा आहे का? मग तिथे सैनिकांना का पाठवतात, आरएसएसच्या लोकांना तिथे काठी घेऊन पाठवा ते सीमेची सुरक्षा करतील.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com