Operation Sindoor : पाकने आततायीपणा केल्यास सडेतोड उत्तर : अजित दोवाल
Ajit Doval : ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने तणाव वाढवण्याचा हेतू नसल्याचे सांगून, NSA अजित डोवाल व परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी जागतिक देशांशी संवाद साधत कारवाईची सविस्तर माहिती दिली.
नवी दिल्ली : आगामी काळात तणाव वाढवण्याचा भारताचा कोणताही इरादा नाही, मात्र पाकिस्तानने आततायीपणा केल्यास त्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल, असा संदेश राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी दिला आहे.