
Rafale Deal: राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीची डील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी भारत सरकारनं पुन्हा एकदा २६ राफेल लढाऊ विमानं फ्रान्सकडून घेण्याची डील केली आहे. या व्यवहारापोटी भारतानं ६३,००० कोटी रुपयांहून अधिक किंमतीची डील फायनल केली आहे. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीनं (CCS) याला मंजुरी दिली आहे. संरक्षण विभागातील सुत्रांच्या हवाल्यानं इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे.