esakal | देशात २४ तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट; बरे झालेल्यांची संख्या जास्त
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकऱण मोहिमसुद्धा वेगाने सुरु असून गुरुवारी दिवसभरात देशात ६७ लाख ५८ हजार ४९१ जणांना लस देण्यात आली.

देशात २४ तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - भारतात गेल्या २४ तासात नव्या कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्याचं दिसून आलं. गुरुवारी दिवसभरात ३४ हजार ९७३ नवीन कोरोना रुग्ण आढळले. बुधवारच्या तुलनेत ७.७ टक्के कमी रुग्णांची नोंद गुरुवारी झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. तर दिवसभरात २६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३३ कोटी १७ लाख ४९ हजार ९५४ इतकी झाली आहे. देशात सध्या ३ लाख ९० हजार ६४६ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.

गेल्या २४ तासात भारतात ३७ हजार ६८१ जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत ३२ कोटी ३४ लाख २ हजार २२९ जणांनी कोरोनावर मात केली असून ४ लाख ४२ हजार ९ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. देशात रिकव्हरी रेट हा ९७.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

हेही वाचा: डेंग्युचा D2 स्ट्रेन प्राणघातक ठरु शकतो - ICMR संचालक

आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट २.३१ टक्के असून गेल्या ७७ दिवसांपासून हा दर ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा १.९६ टक्के इतका असून गेल्या ११ दिवसांपासून तो ३ टक्क्यांहून कमी आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकऱण मोहिमसुद्धा वेगाने सुरु असून गुरुवारी दिवसभरात देशात ६७ लाख ५८ हजार ४९१ जणांना लस देण्यात आली. आतापर्यंत देशात ७१ कोटी ३७ लाख लोकांना डोस देण्यात आले आहेत.

loading image
go to top