esakal | '...तर निर्बंध कठोर करा', केंद्राचे राज्यांना नवे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

CORONA

अनलॉक केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणे, पर्यटन स्थळे आणि बाजारात लोकांची गर्दी उसळली आहे. तसंच सोशल डिस्टन्सिंग न पाळता आणि विनामास्क लोक फिरत आहेत.

गर्दी वाढल्यास निर्बंध कठोर करा, केंद्राचे राज्यांना नवे आदेश

sakal_logo
By
सूरज यादव

कोरोनाची दुसरी लाट आता जवळपास ओसरली असून अनेक राज्यांमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल केले जात आहेत. दरम्यान, अनलॉक केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणे, पर्यटन स्थळे आणि बाजारात लोकांची गर्दी उसळली आहे. तसंच सोशल डिस्टन्सिंग न पाळता आणि विनामास्क लोक फिरत आहेत. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली होती. केंद्र सरकार आणि मोदींनी आवाहन केल्यानंतरही लोकांची गर्दी कमी होत नसल्यानं गृहमंत्रालयाने नवीन आदेश काढले आहेत. यामध्ये जर गर्दी वाढली तर लॉकडाऊन करा अशा सूचना राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना दिल्या आहेत.

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी देशातील सर्व राज्यांना पत्र पाठवले असून निर्बंध लागू करण्यास सांगितलं आहे. पत्रात म्हटलं आहे की, ज्या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे पालन होत नाही तिथं पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात यावा. राज्याच्या मुख्य सचिवांना याबाबतचे पत्र पाठवले आहे. त्यात कोरोनाबाबत 5 पातळ्यांवर योजना तयार करण्यास सांगितलं आहे. सरकारकडून राज्यांना टेस्ट, ट्रॅक, ट्रीटमेंट, लसीकरण आणि कोरोना प्रोटोकटलचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा: Corona Update : 24 तासांत 38,792 नवे रुग्ण; 624 जणांचा मृत्यू

कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा आणि गर्दीच्या जागांवर कमी लोक येतील अशी व्यवस्था करण्यास सांगितलं आहे. तसंच राज्यांनी कोरोना व्यवस्थापन योग्य पद्धतीने ठरवावं असंही पत्रात सांगण्यात आलं आहे.

राज्यांसाठी अॅडवायजरी जारी करताना केद्राने म्हटलं की, अजुनही सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन होत आहे. बाजारात गर्दी केली जात आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढत असून ही बाब चिंताजनक आहे. 1.0 पेक्षा जास्त आर फॅक्टरमध्ये वाढ ही कोरोना संसर्गाचा एक संकेत आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी गर्दी कमी करण्यासाठी पावले उचलावीत. गर्दीच्या ठिकाणी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

loading image