esakal | Corona Update : देशात 24 तासांत 38,792 नवे रुग्ण; 624 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Update

Corona Update : 24 तासांत 38,792 नवे रुग्ण; 624 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
नामदेव कुंभार

Coronavirus in india, covid-19, latest updates : सोमवारी नियंत्रणात आलेली रुग्णसंख्या मंगळवारी पुन्हा एकदा वाढली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 38 हजार 792 नवीन रुग्ण आढळले आहेत. याच कालावधीत 41 हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 624 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोना स्थिती -

एकूण रुग्ण Total cases: 3,09,46,074

एकूण कोरोनामुक्त Total recoveries: 3,01,04,720

उपचाराधीन रुग्ण Active cases: 4,29,946

मृताची संख्या Death toll: 4,11,408

एकूण लसीकरण Total vaccinated : 38,76,97,935

हेही वाचा: नितीन राऊतांचे खाते पटोलेंना हवे?

मागील 24 तासांतील लसीकरण - 37,14,441

आयसीएमआरने (ICMR) दिलेल्या माहितीनुसार, 12 जुलै 2021 पर्यंत देशात 43 कोटी 59 लाख 73 हजार 639 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. मंगळवारी देशात 19 लाख 15 हजार 501 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

लस अपडेट -

14 जुलै 2021, बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 38 कोटी 76 लाख 97 हजार 935 जणांचं लसीकरण झालं आहे. मागील 24 तासांत 37 लाख 14 हजार 441 जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात मागील 24 तासांत 7,243 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 61,72,645 झाली आहे. राज्यात एकूण 1,04,406 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 196 रुग्ण दगावले. त्यांपैकी 167 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 29 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. मृतांचा एकूण आकडा 1,26,220 वर पोहोचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,43,83,113 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61,72,645 (13.91 %) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,74,463 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,607 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवड भाजप नगरसेविकाचं डेंग्यूमुळे निधन, परिसरात हळहळ

काही राज्यात कडक लॉकडाउन -

देशातील 8 राज्यांमध्ये कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिसा, तामिळनाडू, मिजोरम, गोवा आणि पुडुचेरी या राज्यांचा समावेश आहे. या राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

हेही वाचा: फडणवीस यांना नेता मानत नाहीत का? पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर

23 राज्य/केंद्रशासित प्रदेशांत आंशिक लॉकडाउन

देशातील 23 राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आंशिक लॉकडाउन लावण्यात आलेला आहे. येथे निर्बंधासोबत सूट देण्यात आली आहे. काही ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्यामुळे निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. छत्तीसगढ, कर्नाटक, केरळ, बिहार, दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब, जम्मू-कश्मीर, लडाख, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, मेघालय, नगालँड, आसम, मणिपूर, त्रिपुरा, आंध्रप्रदेश आणि गुजरात या राज्यात आंशिक लॉकडाउन लावण्यात आलेला आहे.

हेही वाचा: काँग्रेसचे बडी नेतेमंडळी पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

loading image