
ED officials conduct raids at Sreeson Pharmaceuticals and Tamil Nadu FDA officers’ residences after the deadly Coldriff cough syrup claimed 21 children’s lives in MP and Rajasthan.
esakal
Summary
सिरपमध्ये आढळलेल्या डायथिलीन ग्लायकोल (DEG) रसायनामुळे मुलांच्या किडन्या निकामी झाल्या.
कंपनीचा मालक रंगनाथनला मध्य प्रदेश पोलिसांनी ९ ऑक्टोबर रोजी अटक केली.
केंद्र व राज्य सरकारांनी दोषींवर कठोर कारवाई आणि औषध उद्योगातील तपासाची हमी दिली.
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विषारी कोल्ड्रिफ सिरपमुळे २१ मुलांचा मृत्यू झाला. या सिरपमागील कंपनीविरुद्ध सतत कारवाई सुरू आहे. आता, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या प्रकरणात दाखल झाले आहे. सोमवारी ईडीने कोल्ड्रिफ कफ सिरप बनवणाऱ्या कंपनी श्रीसन फार्मास्युटिकल्सशी संबंधित जागेवर आणि तमिळनाडू एफडीएच्या उच्च अधिकाऱ्यांवर मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली छापे टाकले.