esakal | सहा राज्यात ८४ टक्के कोरोनाबाधित, महाराष्ट्रानंतर गुजरातनं वाढवलं टेन्शन
sakal

बोलून बातमी शोधा

सहा राज्यात ८४ टक्के कोरोनाबाधित, महाराष्ट्रानंतर गुजरातनं वाढवलं टेन्शन

सहा राज्यातील कोरोना रुग्णांची होणारी वाढ देशाची चिंता वाढवणारी आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब आणि तामिळनाडू यासारख्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे.

सहा राज्यात ८४ टक्के कोरोनाबाधित, महाराष्ट्रानंतर गुजरातनं वाढवलं टेन्शन

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

भारतामध्ये कोरोना महामारीची प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. दरदविशी कोरोना रुग्णांच्या संख्या नवा विक्रम प्रस्थापीत करत आहे. आरोग्य मंत्रायलानं मंगळवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनं थोडाफार दिलासा दिला. मात्र, सहा राज्यातील कोरोना रुग्णांची होणारी वाढ देशाची चिंता वाढवणारी आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब आणि तामिळनाडू यासारख्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. महाराष्ट्र आणि गुजरातसह सहा राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या देशातील एकूण नव्या रुग्णांपैकी ८४ टक्के इतकी आहे.  या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे लोकांच्या चिंतेत भर पडत आहे. 

भारतामध्ये सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट आली असून झपाट्यानं रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दररोजच्या वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं गतवर्षीचा विक्रमही मोडीत काढला आहे.  गुजरातमधील आजच्या आकडेवारीनेही नवीन विक्रम प्रस्थापीत केले आहेत. पुन्हा एकदा कोरोना महामारीनं आपला प्रादुर्भाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे देशातील महत्वाच्या शहरांमध्ये लॉकडाउन करण्यात आलं आहे. तर काही राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. 

२४ तासांत मिळाला दिलासा - 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी सकाळी जारी केलेल्या नव्या आकडेवारीनं थोडाफार दिलासा दिला आहे. मागील २४ तासांत देशात ४० हजार ७१५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे देशातील एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या1,16,86,796 झाली आहे. मागील २४ तासांत १९९ रुग्णांच्या मृत्यूसह देशातील एकूण मृत्यूची संख्या एक लाक ६० हजार १६६ इतकी झाली आहे.  

गुजरातमध्ये कोरोनाचा नवीन विक्रम -
गुजरात राज्यात सोमवारी कोरोना महामारीनं नवीन विक्रम प्रस्थापीत केला आहे. गुजरातमध्ये २४ तासांत १६४० नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. गुजरातमधील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. मागील वर्षभरापासून गुजरामध्ये कोरोनाची वाढ आटोक्यात होती. मात्र, दुसऱ्या लाटेंमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे.  गतवर्षी २७ सप्टेंबर रोजी गुजरातमध्ये  १६०७ नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या होती. मात्र, गेल्या २४ तासांत गुजरातमध्ये मिळालेल्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.  

छत्तीसगढमध्ये निर्बंध -
मागील २४ तासांत छत्तीसगढमध्ये १५२५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दररोजच्या वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येमुळे छत्तीसगढ सरकारनं राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत. शाळा, महाविद्यलये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दहावी आणि १२ वगळता सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.