Bangalore Stampede : बंगळूर येथील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर (Chinnaswamy Stadium) भीषण चेंगराचेंगरी झाली आणि यात ११ लोकांचा बळी गेला, तर ३३ लोक गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे RCB चाहत्यांच्या जल्लोषावर पाणी फेरले.
Bangalore Stampede : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा (आरसीबी) आयपीएलमधील विजयोत्सव आता एका शोकांतिकेत बदलला आहे. चेंगराचेंगरीत ११ जणांचा बळी गेला आहे. सरकारच्या (Government) चुकीमुळे लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, असा आरोप होत आहे.