
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान भारताच्या सीमावर्ती भागात सतत गोळीबार करत आहे. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. गुरुवारी भारताने हार्पी ड्रोनचा वापर केला. या ड्रोनच्या मदतीने भारताने पाकिस्तानचे हवाई संरक्षण नष्ट केले. हार्पी ड्रोन रडार सिस्टमवर हल्ला करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. ते शत्रूच्या हवाई संरक्षणाचा नाश करण्यात तज्ज्ञ आहेत . त्यात एक शक्तिशाली बॉम्ब बसवलेला आहे. एका ड्रोनची किंमत कोट्यवधी रुपयांत आहे.