E100 Fuel India: शंभर टक्के इथेनॉलचा आता वाहनांसाठी पर्याय

100% Ethanol Cars Get Government Approval : केंद्र सरकारने वाहन नियमांत बदल करून शंभर टक्के इथेनॉल असलेल्या ई-१०० इंधनाला मान्यता दिली आहे. मात्र, हे इंधन वापरण्यासाठी वाहन फ्लेक्स-फ्युएल तंत्रज्ञानानुसार तयार केलेले असणे आवश्यक आहे
India has approved E100 ethanol fuel for compatible flex-fuel vehicles.

India has approved E100 ethanol fuel for compatible flex-fuel vehicles.

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : पेट्रोलला पर्याय म्हणून शंभर टक्के इथेनॉल वापरणाऱ्या वाहनांचा (फ्लेक्स फ्युएल व्हेइकल) मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनविषयक नियमांत बदल करून ‘ई-१००’ इंधनाला मान्यता दिली आहे. यापूर्वी ‘ई-८५’ इंधनाचा पर्याय उपलब्ध होता. या नव्या नियमांची अंमलबजावणी तातडीने सुरू झाली आहे.

‘इथेनॉल’ हे प्रामुख्याने उसासारख्या वनस्पतींपासून तयार केले जाणारे इंधन आहे. ‘ई-१००’ म्हणजे जवळपास शंभर टक्के इथेनॉल असलेले इंधन. या निर्णयामुळे पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी वाहन उत्पादकांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या मान्यतेनंतर,

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com