भारताची अर्थव्यवस्थेत दुपटीने वाढ होईल : मोदी

पीटीआय
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

 "भारतीय अर्थव्यवस्था ही मजबूत तत्त्वांवर आधारित आहे. नजीकच्या काळात त्यात दुपटीने वाढ होऊन पाच हजार अब्ज डॉलरपर्यंत तिचा विस्तार होईल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्यक्त केला. दक्षिण कोरियातील गुंतवणूकदारांसाठी भारत म्हणजे "संधीची भूमी' आहे, असे वर्णन त्यांनी केले.

सोल : "भारतीय अर्थव्यवस्था ही मजबूत तत्त्वांवर आधारित आहे. नजीकच्या काळात त्यात दुपटीने वाढ होऊन पाच हजार अब्ज डॉलरपर्यंत तिचा विस्तार होईल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्यक्त केला. दक्षिण कोरियातील गुंतवणूकदारांसाठी भारत म्हणजे "संधीची भूमी' आहे, असे वर्णन त्यांनी केले.

दक्षिण कोरियाच्या भेटीदरम्यान भारत-आरओके उद्योग परिसंवादात ते बोलत होते. ""या वर्षानंतर जगातील कोणतीही मोठी अर्थव्यवस्था 7 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक प्रगती करू शकणार नाही. ह्युंदाई, सॅमसंग, एलजी इलेक्‍ट्रॉनिक्‍स यांसारख्या 600 कोरियन कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केलेली आहे. आम्ही अन्य कंपन्यांचेही भारतात स्वागत करतो. मोटार उत्पादक "किया' ही कंपनी लवकरच भारतात आगमन करणार आहे.''

भारतात औद्योगिक भेट सहज शक्‍य व्हावी यासाठी कोरियाच्या नागरिकांसाठी आम्ही गेल्या ऑक्‍टोबर महिन्यापासून "व्हिसा ऑन अराईव्हल' धोरण अमलात आणले आहे, असेही त्यांनी सांगितले. 

मोदी म्हणाले...

- "ईझ ऑफ डुईंग बिझिनेस'च्या क्रमवारीत पहिल्या 50 क्रमांकात येण्याचा निश्‍चय 
- थेट परकी गुंतवणुकीसाठी (एफडीआय) अनुकूल वातावरण 
- गेल्या चार वर्षांत देशाला "एफडीआय'मधून 250 अब्ज मिळाले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India economy will double soon says PM Modi