Bullet Train Look: 'वेगाची राणी' आली! भगवा रंग अन् फ्युचरिस्टिक डिझाइन... भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक समोर

Indian bullet train photo: भारतीय रेल्वेने मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा प्रस्तावित आराखडा प्रसिद्ध केला आहे. या अत्याधुनिक ट्रेनचे पहिले चित्र प्रदर्शित करण्यात आले आहे.
Bullet Train Look

Bullet Train Look

ESakal

Updated on

भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सोशल मीडियावर बुलेट ट्रेनचा एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ही हाय-स्पीड ट्रेन आकर्षक केशरी आणि पांढऱ्या रंगात दिसत आहे. ट्रेनचा भविष्यवेधी लूक आणि हाय-स्पीड डिझाइन लक्ष वेधून घेत आहे. हा फोटो समोर येताच, इंटरनेटवरील लोकांनी तिला 'क्वीन ऑफ स्पीड' म्हणायला सुरुवात केली. असा दावा केला जात आहे की, हीच ती ट्रेन आहे जी भारतात बुलेट ट्रेन म्हणून धावेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com