esakal | देशातील पहिल्या रुग्णाला दीड वर्षानंतर पुन्हा कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

corona

भारतातील पहिला कोरोना रुग्ण 30 जानेवारी 2020 रोजी केरळमध्ये सापडला होता.

देशातील पहिल्या रुग्णाला दीड वर्षानंतर पुन्हा कोरोनाची लागण

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - भारतातील पहिला कोरोना रुग्ण 30 जानेवारी 2020 रोजी केरळमध्ये सापडला होता. एक मेडिकल विद्यार्थीनी देशातील पहिली कोरोनाबाधित ठरली होती. केरळमधील थ्रीसूर जिल्ह्यातील त्या विद्यार्थीनीला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. जवळपास दीड वर्षाने तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

त्रिशूरमधील डॉक्टर केजे रिना यांनी सांगितलं की, तिची आरटी पीसीआर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मात्र अँटिजेन निगेटिव्ह आहे. सध्या तिला कोणतीही लक्षणे नाहीत. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने दिल्लीला विमानाने प्रवास करण्याआधी कोरोना चाचणी केली होती. त्यात टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

हेही वाचा: तिसरी लाट रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज : PM मोदी

दरम्यान, पहिल्या कोरोना रुग्णाला पुन्हा लागण झाल्यानं चिंता करण्याचं कारण नाही. तिच्यामध्ये लक्षणं दिसत नाही. वुहानमधून परतल्यानंतर ती पुन्हा तिकडे गेली नाही. घरातूनच ऑनलाइन वर्ग घेत होती.

loading image