esakal | तिसरी लाट रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज; मोदींनी व्यक्त केली चिंता
sakal

बोलून बातमी शोधा

narendra modi

कोरोनामुळे पर्यटन, व्यापार - उद्योग यावर परिणाम झाला हे खरं आहे. पण पर्यटन स्थळी, बाजारपेठांमध्ये मास्क न घालता फिरणं, मोठी गर्दी करणं योग्य नाही असं मोदींनी म्हटलं.

तिसरी लाट रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज : PM मोदी

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वोत्तर राज्यांमधील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी सध्या पर्यटन स्थळी आणि बाजारपेठांमध्ये उसळणाऱ्या गर्दीबाबत चिंता व्यक्त केली. मोदी म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट रोखणं ही आपली जबाबदारी आहे. कोरोनाच्या प्रत्येक व्हेरिअंटवर नजर ठेवायला हवी. म्युटेशननंतर किती मोठं आव्हान असेल याचा अभ्यास तज्ज्ञांकडून केला जात आहे. अशा परिस्थितीत रोखणं आणि त्यावर उपचार करणं महत्त्वाचं आहे.

कोरोनामुळे पर्यटन, व्यापार - उद्योग यावर परिणाम झाला हे खरं आहे. पण पर्यटन स्थळी, बाजारपेठांमध्ये मास्क न घालता फिरणं, मोठी गर्दी करणं योग्य नाही असं मोदींनी म्हटलं. केंद्राकडून सर्वांना लस मोफत लस मोहिम देशभरात चालवली जात आहे आणि त्याचं महत्त्व नॉर्थ इस्टमध्येही आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपल्याला लसीकरण मोहिमेचा वेग वाढवावा लागणार आहे.

हेही वाचा: 4 जुलै रोजीच आली तिसरी लाट, संशोधकाचा दावा

पूर्वोत्तर राज्यांमध्ये कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्याला टेस्टिंग आणि ट्रिटमेंटसाठीच्या व्यवस्थेमध्ये सुधारणा करून पुढे जावं लागेल. यासाठी नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 23 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. नॉर्थ इस्टमधील प्रत्येक राज्याला या पॅकेजमधून हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी मदत मिळेल.

हेही वाचा: संसदेजवळ 200 शेतकऱ्यांसह होणार आंदोलन; टिकैत यांचा इशारा

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आपल्याला सूक्ष्म पातळीवर आणि कठोर पावलं उचलावी लागतील. यामुळे जबाबदारी निश्चित होईल. मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये आपल्याला जास्त काम करावं लागेल. गेल्या दीड वर्षात मिळालेल्या अनुभवाचा पूर्म वापर करावा लागेल असं मोदींनी यावेळी म्हटलं. संपूर्ण देश आणि विशेषत: आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जबाबदारी पार पाडण्यासाठी खूप कष्ट केलं आहे. पूर्वोत्तर राज्यांमधील भौगोलिक परिस्थिती आव्हानात्मक आहे. तरीही दूर्गम अशा ठिकाणी टेस्टिंग आणि ट्रिटमेंटसह लसीकरण मोहीम नीट होईल याची दक्षता घेतली गेली असेही मोदी म्हणाले.

loading image