Air Force : भारतीय हवाई दलाला मिळणार पहिले 'मेड इन इंडिया' लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Helicopter

Air Force : भारतीय हवाई दलाला मिळणार पहिले 'मेड इन इंडिया' लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर

दिल्ली : भारतीय हवाई दलाला आज पहिले भारतीय बनावटीचे लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर मिळणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम होणार आहे. काल संरक्षण मंत्री जोधपूरला भेट दिली त्यावेळी "या हेलिकॉप्टरमुळे भारतीय संरक्षण क्षेत्राला चालना मिळेल" असं सांगितलं.

"मी जोधपूर येथे होणाऱ्या भारतीतल पहिल्या स्वदेशी बनावटीच्या लाईट कोमॅट हेलिकॉप्टर हवाई दलाला सुपूर्द करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. या हेलिकॉप्टरमुळे भारतीय हवाई दलाच्या पराक्रमाला चालना मिळणार आहे" असं राजनाथ सिंह यांनी ट्वीट करत सांगितलं आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाला हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी देखील उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा: Eknath Shinde: जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

सर्व प्रकारच्या हवामानात लढाऊ क्षमता, उच्च प्रतीच्या हल्ल्याची क्षमता, चपळता ही हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने विकसित केलेल्या, या हेलिकॉप्टरमध्ये चिलखत संरक्षण, रात्रीच्या हल्ल्याची क्षमता आणि क्रॅश-योग्य लँडिंग गियर असल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, भारतीय हवाई दलाच्या ट्वीटरवरून 'आत्मनिर्भर भारत' असा हॅशटॅग वापरून ट्वीट करण्यात आले. यामध्ये त्यांनी या हेलिकॉप्टरची झलक द्ली आहे.

टॅग्स :Air Force