
Flood-hit city streets in North India where boats are being used for rescue operations amid rising water levels
esakal
Summary
उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि पंजाबसह अनेक राज्यांत अतिवृष्टीमुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे.
हजारो गावे पाण्यात बुडाली असून लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे; पंजाबमध्ये आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू झाला आहे.
हवामान विभागाने राजस्थान, गुजरातसह उत्तर भारतातील अनेक राज्यांत पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
India Floods Update: उत्तर भारतातील अनेक राज्यांत अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. हजारो गावे पुरात बुडाली आहेत. सर्वत्र निसर्गाच्या कोपामुळे वि्ध्वंस झाला आहे. उत्तर प्रदेशात यमुना आणि गंगा दुथडी भरून वाहत आहेत, मथुरेत परिस्थिती अशी आहे की रस्त्यांवर बोटी वाहू लागल्या आहेत, प्रयागराज आणि वाराणसीमध्ये गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे, हरियाणातील अनेक शहरांनाही पुराचा तडाखा सहन करावा लागत आहे.