मोदी, फडणवीसांकडून वाजपेयींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशातील विविध नेत्यांनी आज (शुक्रवार) भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशातील विविध नेत्यांनी आज (शुक्रवार) भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे गुरुवारी (ता. 16) सायंकाळी निधन झाले. वाजपेयी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी गुरुवारी संध्याकाळपासून त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी ठेवले होते. आज सकाळी दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजप कार्यालयात ठेवण्यात आले. त्यांचे पार्थिव आज सकाळी दिल्लीतील निवासस्थानातून भाजपा मुख्यालयाकडे रवाना झाले. भाजप मुख्यालयामध्ये देशातील विविध नेत्यांनी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. सर्वसामान्य नागरिकही पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत आहेत. अंत्ययात्रेत सुमारे 5 लाख लोक येतील, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, या पार्श्वभूमीवर बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यासह देशभरातील विविध नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतले. वाजपेयी यांच्या पार्थिवावर दिल्लीत राजघाटावरील राष्ट्रीय स्मृतीमध्ये आज दुपारी 4 वाजताअंत्यसंस्कार होणार आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

अंत्यदर्शन, अंत्ययात्रा आणि अंत्यसंस्काराची वेळ आणि ठिकाण :

  • अंत्यदर्शन - दिल्लीतील कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थान (सकाळी 7.30 ते 8.30)
  • अंत्यदर्शन - दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजप कार्यालय (सकाळी 9 ते दुपारी 1)
  • अंत्ययात्रा - दुपारी 1 वाजता सुरुवात
  • अंत्यसंस्कार - संध्याकाळी 4 वाजता राजघाटावरील राष्ट्रीय स्मृती
Web Title: india former prime minister atal bihari vajpayee funeral and leaders workers pay tributes at bjp hq