'माजी उपराष्ट्रपतीच' म्हणतात देशात वाढली 'असहिष्णुता'...

देशाचे माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी हे त्यांच्या एका वक्तव्यासाठी चर्चेत आले आहेत.
Hamid Ansari
Hamid Ansari

Hamid Ansari On Indian Democracy: देशाचे माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी हे त्यांच्या एका वक्तव्यासाठी चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेल्या त्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी देशातील राजकीय वातावरण, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवरुन वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी (Indian Celebrity) वक्तव्य केलं आहे. मात्र आता खुद्द माजी उपराष्ट्रपती यांनी केलेल्या वक्तव्यांनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वी देखील अन्सारी यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केल्याचे सांगितले जात आहे. अन्सारी काय म्हणालेत हे आपण जाणून घेणार आहोत.

अन्सारी (hamid ansari) यांनी आयएसआयशी (ISI) जोडल्या गेलेल्या काही संस्थांच्या कार्यक्रमाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सध्याच्या भारतीय लोकशाही आणि त्याच्याशी संबंधित काही संस्थांसंबंधी खंत व्यक्त केली आहे. याशिवाय हिंदू राष्ट्रवादावरही प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानी गुप्तहेर संघटना असणाऱ्या आयएसआयशी जोडल्या गेलेल्या आपल्या देशातील संस्थाप्रती आपण नाराज असल्याचे हमिद यांनी म्हटले आहे. अन्सारी यांनी देशाची लोकशाही आणि त्याच्यावर होणारी वेगवेगळी आक्रमणं यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यानं अमेरिकन मुस्लिम कौन्सिल आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलले आहेत.

Hamid Ansari
PM मोदींच्या लूकची चर्चा; निवडणूक असलेल्या दोन राज्यांशी संबंध

गेल्या काही वर्षांमध्ये आपण अशा काही विचारांना मोठं केलं आहे त्याचा आपल्या देशावर गंभीर परिणाम होतो आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रवादाचा उल्लेख करावा लागेल. आपण आपल्याच राष्ट्रवादाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या तयार करुन ठेवल्या आहेत. सध्या वर्तमान काळात बहुमत धार्मिकता स्वरुपाचे अराजकीय विचार वाढीस लागले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम देशाच्या विकासावर होत असल्याचे दिसून आले आहे. यापुढील काळात देशातील नागरिकांनी अधिक सतर्क होण्याची गरज असल्याचे अन्सारी म्हणाले आहेत.

Hamid Ansari
शरद पवार कोरोना संक्रमित कळताच PM मोदींना काळजी; लगेच केला फोन!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com