कार्बन उत्सर्जनात भारत चौथ्या क्रमांकावर

पीटीआय
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : कार्बन डाय-ऑक्‍साईडच्या उत्सर्जनात भारताचा जगात चौथा क्रमांक असून, एकूण कार्बन उत्सर्जनापैकी सात टक्के वाटा भारताचा असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. 

ग्लोबल कार्बन प्रोजेक्‍ट या संस्थेने 2017 ची आकडेवारी असलेला हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, कार्बन उत्सर्जनात चीन पहिल्या क्रमांकावर असून हा देश 27 टक्के कार्बनचे उत्सर्जन करतो. यानंतर अमेरिका (15 टक्के) आणि युरोपीय महासंघाचा (10 टक्के) क्रमांक लागतो. हे प्रमुख चार देश मिळून एकूण 59 टक्के उत्सर्जन करतात. भारताचा आर्थिक विकास होत असतानाच कार्बन उत्सर्जन वाढत असल्याचा निष्कर्ष अहवालात काढण्यात आला आहे.

भारतामध्ये कोळसा वापराचे प्रमाण 7.1 टक्‍क्‍यांनी, पेट्रोलियम पदार्थांचा वापर 2.9 टक्‍क्‍यांनी आणि नैसर्गिक वायूच्या वापराचे प्रमाण 6 टक्‍क्‍यांनी वाढल्याने कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणही वाढल्याचे अहवालात म्हटले आहे. 2018 मध्ये उत्सर्जनाचे प्रमाण अधिक वाढण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. कार्बन उत्सर्जनाच्या क्रमवारीत भारतानंतर रशिया, जपान, जर्मनी, इराण, सौदी अरेबिया आणि दक्षिण कोरिया यांचा क्रमांक आहे. 

भारत, चीनवर स्थिती अवलंबून 

भारत आणि चीनमध्ये अद्यापही कोळशावर ऊर्जानिर्मितीचे प्रमाण अधिक आहे आणि ते आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. चीन, भारत आणि युरोपीय महासंघामधून जवळपास 40 टक्के कार्बनचे उत्सर्जन होते. त्यामुळे या देशांच्या कामगिरीवरच कार्बनचे हवेतील कमी- अधिक प्रमाण ठरते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India is fourth in carbon emissions