India Global Image 2026
esakal
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारताची जगभरातील प्रतिमा नेमकी कशी आहे, याचा अंदाज एका नव्या सर्वेक्षणातून आला आहे. प्यू रिसर्च सेंटरने 36 देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात भारताबाबतची मतं काहीशी संमिश्र असली, तरी अनेक देशांमध्ये भारताकडे सकारात्मक नजरेने पाहिलं जात असल्याचं समोर आलं आहे.
फेब्रुवारी ते मे २०२६ दरम्यान झालेल्या या सर्वेक्षणात ४२ हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. सहभागी देशांमध्ये भारताबद्दल सरासरी ४५ टक्के लोकांचं मत सकारात्मक होतं, तर ४१ टक्के लोकांनी भारताबाबत नकारात्मक मत व्यक्त केलं आहे.