
esakal
PM Modi Talks with French President Macron: भारत दिवसेंदिवस आपले परराष्ट्र धोरण अधिक मजबूत बनवत आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या भूमिकेलाही आता चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. एकीकडे अमेरिकेसोबत टॅरिफ वॉरमध्ये भारताला जगातील रशिया, चीन या बलाढ्या राष्ट्रांचा पाठिंबा मिळाला असताना, आता दुसरीकडे भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंधही अधिक भक्कम होताना दिसत आहेत.
कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी फोनवरून विविध मुद्द्यांवर चर्चा केली आहे. दोन्ही नेत्यांनी भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला आहे. तसेच यादरम्यान, युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नांवर चर्चा झाली.
विशेष म्हणजे मागील महिन्यात चीनमधील शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतली. चीन भेटीपूर्वी त्यांनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून युक्रेनमध्ये युद्ध आणि शांततेच्या शक्यतांवर चर्चा केली होती.
तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून एका पोस्टद्वारे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली आहे. मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी खूप चांगली चर्चा झाली. आम्ही विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीचा आढावा घेतला आणि त्याचे सकारात्मक मूल्यांकन केले. युक्रेनमधील संघर्ष लवकरच संपवण्याच्या प्रयत्नांसह आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर आम्ही विचार मांडले. जागतिक शांतता आणि स्थिरता वाढविण्यात भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी महत्त्वाची भूमिका बजावतील.'
युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधल्यानंतर दोन दिवसांनी ही चर्चा झालीले. यामध्ये, त्यांनी भर दिला की युक्रेन आणि रशियामध्ये तीन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपवण्यात आणि शांततेचा मार्ग मोकळा करण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
वॉन डेर लेयन म्हणाले होते की, 'राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत भारताच्या सततच्या सहकार्याचे आम्ही मनापासून स्वागत करतो. युक्रेनमधील आक्रमक युद्ध संपवण्यात आणि शांततेचा मार्ग मोकळा करण्यात भारताने विशेष भूमिका बजावली आहे.' भारताचे पंतप्रधान मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी सतत संपर्कात आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधील सर्वात घातक युद्ध संपवण्यासाठी त्यांनी वारंवार संवाद आणि राजनयिकतेचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.