भारत बनणार ऑनलाइन बाजाराचा एक्का

वृत्तसंस्था
बुधवार, 7 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - ई- कॉमर्सच्या क्षेत्रात गेल्या काही दिवसांमधील घोडदौड पाहता या क्षेत्रात भारत क्रमांक एकचा देश होऊ शकतो, असा अंदाज एका संस्थेने केलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. सध्या अमेरिकेचे ऑनलाइन बाजारावार वर्चस्व आहे; मात्र, आगामी काळात भारत अमेरिकेला मात देऊ शकतो, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सध्या ई- कॉमर्सच्या क्षेत्रात अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या ऑनलाईन बाजारातील ग्लोबल पेमेंट्‌स रेकॉर्ड संस्था "वर्ल्डप्ले'ने केलेल्या अहवालानुसार भारतामध्ये ई- कॉमर्स क्षेत्राचा वेगाने विस्तार होत आहे. 2016 ते 2020 यादरम्यान भारत ऑनलाइन बाजारात एक नंबरचा देश बनण्याची शक्‍यता आहे. सध्याच्या ई- कॉमर्स क्षेत्रातील भारताची कामगिरी पाहता 2034 पर्यंत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश होऊ शकतो. यासाठी इंटरनेट युजर्सच्या संख्येतील वाढ व मोबाईल फोन्सची जास्तीत जास्त विक्री होणे आदी कारणे यामागे असणार आहेत.

पेमेंट प्रक्रिया कंपनी "वर्ल्डप्ले'चे उपाध्यक्ष रॉन कलिफा यांच्या म्हणण्यानुसार बाजारातील ट्रेंड व संशोधनाचा कल पाहता आगामी दोन दशकांमध्ये ई-कॉमर्स क्षेत्रात भारताचे मानांकन आणखी होऊ शकते. 2020 पर्यंत भारत ई-कॉमर्स बाजारात 63.7 अब्ज डॉलरपर्यंत पोचण्याची शयता आहे. 2034 पर्यंत अशीच वाढ होत राहिली तर अमेरिकेला या क्षेत्रात मागे टाकत भारत क्रमांक एकचा देश बनू शकतो. अशा वातावरणामध्ये ऑनलाइन विक्री कंपन्यांना भारतामध्ये सध्या सोन्याचे दिवस आहेत.
ई- कॉमर्स क्षेत्राशी निगडित अमॅझॉन व अलिबाबासारख्या कंपन्यांनी भारतातील वाढीवर लक्ष्य केंद्रित केलेले आहे. याचसोबत इतर कंपन्या ऑनलाइन बाजारातील गुंतवणुकीसाठी भारताला प्रथम प्राधान्य देत आहेत.
चीन, भारत, हॉंगकॉंग, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियासहित 30 देशांमध्ये वर्ल्डप्लेने संशोधन केले. यामधून आलेल्या माहितीचे संकलन करून अहवालाला अंतिम रूप देण्यात आले.

Web Title: India is going to be online market Ekka