
Cough Syrup Alert
sakal
cough syrup banned : भारतात मागील काही दिवसांत कफ सिरप घेतल्याने किडनी निकामी होवून किमान २२ लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आता भारत सरकारने याबाबत अतिशय कडक भूमिका घेतली असून, कोल्ड्रिफ, रेस्पीफ्रेश टीआर आणि रिलाइफ या तीन कफ सिरपना विषारी घोषित केलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे.
मध्य प्रदेशमधील छिंदवाडा येथील या मुलांचा किडनी फेल झाल्याने मृत्यू झाला आहे. या मुलांनी खोकल्याचे औषध कोल्ड्रिफचे सेवन केले होते आणि हे औषध विषारी निघाले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे.
जरी सर्व मृत्यू कोल्ड्रिफ सिरपशी संबंधित असले तरी, औषध नियंत्रक प्राधिकरणाने नागरिकांना आणखी दोन सिरप म्हणजेच रेस्पीफ्रेश टीआर आणि रिलाइफ ही औषधी देखील घेण्यापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.तर सध्या या तिन्ही सिरपचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत आणि संबंधित औषध कंपन्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा येथे विषारी कफ सीरपच्या सेवनाने २२ चिमुकल्यांचा जीव गेल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देशात घबराहट पसरली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. यातच आता जागतिक आरोग्य संघटनेने या प्रकरणात एन्ट्री घेतली आहे.
भारतामध्ये बनलेलं हे दूषित औषध देशाबाहेर तर पाठवलेलं नाही ना? असा प्रश्न जागतिक आरोग्य संघटनेने भारतातल्या अधिकाऱ्यांना विचारला आहे. याबाबत अधिकृत माहिती घेतल्यानंतर कफ सीरप, कोल्ड्रिफ यावर 'ग्लोबल मेडिकल प्रॉडक्ट अलर्ट' जारी करण्याबाबत निर्णय घेणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.