esakal | केंद्र सरकारने 18 दहशतवाद्यांची यादी केली जाहीर; छोटा शकीलसह टायगर मेमनचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

tiger memon chota shakil

बेकायदा कृत्यविरोधी दुरुस्ती विधेयका अंतर्गत 18 दहशतवाद्यांची नावे घोषित केली आहेत. यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या काही सहकाऱ्यांची नावेही आहेत.

केंद्र सरकारने 18 दहशतवाद्यांची यादी केली जाहीर; छोटा शकीलसह टायगर मेमनचा समावेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - दहशतवाद्यांविरोधात केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठं पाऊल उचललं असून आता 18 जणांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. बेकायदा कृत्यविरोधी दुरुस्ती विधेयका अंतर्गत 18 दहशतवाद्यांची नावे घोषित केली आहेत. यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या काही सहकाऱ्यांची नावेही आहेत. केंद्राने गेल्याच वर्षी युएपीए कायद्यामध्ये दुरुस्ती केली होती. त्यानुसार भारतात एखाद्या व्यक्तीला दहशतवादी घोषित करता येऊ शकते. याआधी फक्त संघटनेला दहशतवादी संघटना घोषित करता येत होतं. 

केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी एक आदेश जारी केला असून दहशतवाद अजिकबात सहन केला जाणार नाही असं म्हटलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा भक्कम करण्यासाठी आणि दहशतवादाबाबत शून्य सहनशिलता ठेवण्यासाठी सरकारने युएपीएल अधिनियम 1967 नुसार 18 दहशतवाद्यांची नावे जाहीर केली. 

केंद्राने जाहीर केलेल्या यादीमध्ये पाकिस्तानमधीलही काही दहशतवाद्यांचा समावेश आहे. मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यातील आरोपी लष्कर ए तोयबाचा युसूफ मुजम्मील, हाफिज सईदचा मेव्हणा अब्दुर रहमान मक्की यांचीही नावे या यादीमध्ये आहेत. तसंच 1999 मध्ये झालेल्या कंदहार विमान अपहरणातील आरोपी युसूफ अजहर, मुंबई बॉम्बस्फोटाचा कट रचणारा टायगर मेमन, छोटा शकील, हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीन आणि इंडियन मुजाहिद्दीनच्या भटकळ बंधूंनासुद्धा दहशतवादी घोषित केलं आहे.

हे वाचा - हवाला रॅकेटविरोधात ‘प्राप्तिकर’ची कारवाई, कोट्यवधींची माया उघड

18 दहशतवाद्यांची यादी
1 - साजिद मीर (लष्कर ए तोयबा), 2 - युसूफ भट्ट (लष्कर ए तोयबा), 3- अब्दुर रहमान मक्की (लष्कर ए तोयबा), 4- शाहीद महमूद (लष्कर ए तोयबा) 5 - फरहातुल्लाह गोरी 6- अब्दुल रऊफ असगर 7- इब्राहीम अतहर 8- युसूफ अजहर ९. शाहीद लतीफ 10- मोहम्मद युसूफ शाह (हिजबुल मुजाहिद्दीन) 11- गुलाम नबी खान (हिजबुल मुजाहिद्दीन) 12- जफर हुसैन भट्ट 13- रियाज इस्माइल 14- मोहम्मद इकबाल 15- छोटा शकील 16- मोहम्मद अनीस 17- टायगर मेमन 18- जावेद चिकना

loading image
go to top