India Government Earns 800 Crore from Scrap Sale
esakal
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून सरकारी कार्यालयात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं होतं. याअंतर्गत सरकारनं भंगार विकून मोठी रक्कम कमावली आहे. २ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ही मोहीम राबवण्यात आली होती. यावेळी वर्षानुवर्ष पडलेले सामान, फाईल्स, लोखंडासह इत्यादी वस्तू विकण्यात आल्या. मीडिया रिपोर्टनुसार, यातून सरकारने जवळपास ८०० कोटी रुपये कमावले. त्यामुळे ही स्वच्छता मोहिम सरकारसाठी चांगली फायद्याची ठरली.