हिंदू बहुसंख्य असल्यानेच भारतात लोकशाही : सुब्रमण्यम स्वामी

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजु यांनी हिंदू लोकसंख्येबाबत केलेल्या ट्‌विटला पाठिंबा दर्शवित भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी हिंदूंची लोकसंख्या अधिक असल्यानेच भारतात लोकशाही असल्याचे वक्तव्य केले आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजु यांनी हिंदू लोकसंख्येबाबत केलेल्या ट्‌विटला पाठिंबा दर्शवित भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी हिंदूंची लोकसंख्या अधिक असल्यानेच भारतात लोकशाही असल्याचे वक्तव्य केले आहे.

स्वामी म्हणाले, "भारतामध्ये हिंदूंची लोकसंख्या बहुसंख्य आहे. त्यामुळेच येथे लोकशाही आहे. आपण जर पाहिले तर मुस्लिम बहुसंख्य देशामध्ये लोकशाही नसल्याचे दिसते. लोकशाहीच्या फायद्यासाठी आपल्याला हिंदूंचीच लोकसंख्या अधिक ठेवणे गरजेचे आहे. ते कसे करावे हा प्रश्‍न आहे. जर मुस्लिमांनीही हिंदूंप्रमाणे कुटुंब नियोजन केले तर हा प्रश्‍न निर्माण होणार नाही.' रिजिजु यांच्या विधानाबाबत बोलताना स्वामी म्हणाले, 'त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेण्यात येत आहे. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हिंदूंची लोकसंख्या कमी होत असल्याबाबत त्यांनी भाष्य केले आहे' अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

किरण रिजिजु यांनी रविवारी हिंदूंच्या लोकसंख्येबाबत ट्विट केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अरुणाचल प्रदेशला हिंदू राज्यात परावर्तित करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. या आरोपाला उत्तर देताना रिजिजु यांनी 'भारतामध्ये हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे, कारण हिंदू लोक (इतर धर्मातील लोकांचे हिंदू धर्मात) धर्मांतर करून घेत नाहीत. इतर देशांप्रमाणे भारतामध्येही अल्पसंख्यांकांची लोकसंख्या वाढत आहे', अशा शब्दांत ट्विट केले होते. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रिजिजु यांच्या वक्तव्यामुळे मतांचे ध्रुवीकरण होत असल्याचा आरोप समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाने केला आहे. त्यावर 'काँग्रेस आणि काही माध्यमांवर मी नाराज असून आधी काँग्रेसने काय म्हटले ते पाहा. मी केवळ त्यांच्या वक्तव्याला उत्तर दिले', अशा शब्दांत रिजिजु यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Web Title: India has democracy because Hindus are in majority : Swami