ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार; भारतीयांनी घाबरू नये, सरकार सतर्क- केंद्रीय आरोग्यमंत्री

harsh vardhan
harsh vardhan

नवी दिल्ली - ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेन आढळल्यानं खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. ब्रिटनमध्ये लॉकडाऊन आणि इतर अनेक देशांमध्ये प्रवासावर बंदी घालण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, भारताचे आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं की, भारतात लोकांनी घाबरण्याची गरज नाही. सरकार या नव्या प्रकारच्या धोक्याबाबत सतर्क आहे. 

आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी इंडियन सायन्स फेस्टिव्हलवेळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी हर्षवर्धन यांनी व्हायरसच्या नव्या प्रकाराबद्दल विचारेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं की, सरकार प्रत्येक गोष्टीसाठी पूर्णपणे तयार आहे. गेल्या वर्षभरात तुम्ही पाहिलंत की सरकारने गरजेनुसार आणि जनतेसाठी जे काही करावं लागत असेल ते सर्व केलं. त्या सर्व गोष्टी सरकार बघत आहे मात्र अुजुनही तुम्ही मला विचारत असाल तर काळजी करण्याचं कारण नाही. 

ब्रिटनमध्ये नव्या प्रकारामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याचे मानले जात आहे. ब्रिटन सरकारने कोरोनाचा नवा प्रकार नियंत्रणाबाहेरील असल्याचा इशारा दिला असून सरकारच्या या घोषणेनंतर युरोपियन युनियनमधील अनेक देशात ब्रिटनमधून होणारी विमान वाहतूक रद्द करण्यात आली आहे. ब्रिटनमध्येही पुन्हा कडक लॉकडाऊनचा निर्बंध लादण्यात आले आहेत.  कोरोनाचा नवा प्रकार आढळल्यानं आणि संसर्गात वाढ झाल्यानं चिंतेत पडलेल्या आरोग्य मंत्रालयाने सोमवारी बैठकही बोलावली होती.

रविवारी ब्रिटनच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटलं होतं की, नवीन प्रकार संसर्गाच्या बाबतीत नियंत्रणाच्या बाहेर आहे. पंतप्रधान बोरिस जॉनन्सन यांनी इंग्लंडच्या अनेक भागात व्हायसचा नवा प्रकार आढळल्याचं सांगितलं होतं. गेल्या काही काळापासून ब्रिटनमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्यामुळे जवळपास 31 टक्के जनतेला पुन्हा लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. 

अनेक देशांनी ब्रिटनमध्ये जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांवर काही काळासाठी बंदी घातली आहे. यानंतर भारतातही अशी मागणी करण्यात येत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून म्हटलं की, सरकारने ब्रिटनवरून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली पाहिजे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com