esakal | पर्यटनाला जा;मात्र आरोग्य सांभाळा;कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटनाला जा;मात्र आरोग्य सांभाळा;कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला

कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे तुम्ही पर्यटनाचे नियोजन करत असाल तर आरोग्याच्या काळजीला सर्वोत्तम प्राधान्य देणे महत्त्वाचे असल्याचा सल्ला शहरातील तज्ज्ञांनी दिला आहे. 

पर्यटनाला जा;मात्र आरोग्य सांभाळा;कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला

sakal_logo
By
अक्षता पवार - सकाळ वृत्तसेवा

पुणे - अनलॉकनंतर नागरिकांनी घराबाहेर पडून मनमोकळेपणाने फिरण्यास सुरुवात केली आहे. तर काहीजण फिरायला जाण्याचे नियोजन करीत आहेत. परंतु, कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे तुम्ही पर्यटनाचे नियोजन करत असाल तर आरोग्याच्या काळजीला सर्वोत्तम प्राधान्य देणे महत्त्वाचे असल्याचा सल्ला शहरातील तज्ज्ञांनी दिला आहे. 

सलाम महिला पोलिस अधिकाऱ्याला! आरोपी निर्दोष सुटताच 'शौर्य पदक' केले परत​

ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ प्र. के. घाणेकर म्हणाले, ‘‘कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून घरातच लॉकडाउन झालेल्या नागरिकांचा कंटाळा दूर करण्यासाठी पर्यटन ही पहिली पसंती आहे. मात्र, विविध पर्यटनस्थळांना भेट देताना संसर्ग होणार नाही याची काळजी घेणे पर्यटकांच्या हाती आहे. शहरातील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी ग्रामीण भागात जाणाऱ्या पर्यटकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. त्यामुळे अशा ठिकाणी पर्यटन करणे-टाळणे हा पर्याय पर्यटकांनी निवडावा. तसेच अशा ठिकाणी गेल्यास गावाच्या बाहेरच्या मार्गांचा वापर करावा.’’ 

भाजप आमदाराच्या लग्नाला हजारोंची गर्दी; अन् सर्वसामान्यांना फक्त 50 जणांची मर्यादा​

असा आहे पर्यटनाचा ट्रेंड 
दिवाळीच्या तुलनेत आता पर्यटनासाठी नागरिकांची संख्या वाढली आहे. मात्र नागरिकांमध्ये अद्याप कोरोना संदर्भात भीती असल्यामुळे पर्यटनाचे स्थळ निवडताना काळजी घेतली जात आहे. काही पर्यटक महाबळेश्‍वर, पाचगणी, कर्जत, कोल्हापूर, इगतपुरी किंवा पुणे जिल्ह्यातील गड-किल्ले अशा नजीकच्या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी जात आहेत. काहीजण गोवा, राजस्थानसारख्या राज्यातील पर्यटनस्थळांची निवड करत आहेत. मात्र, अद्याप परदेशात जाणाऱ्यांची संख्या तुलनेने कमीच आहे. परदेशात जाणारे दुबई आणि मालदिवला प्राधान्य देत असल्याचे ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन पुणेचे संचालक नीलेश भन्साळी यांनी सांगितले. 

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो, निवडणुका ताकतीने लढवण्याची तयारी करा : वळसे-पाटील​

पर्यटनाला जाण्यापूर्वी आरोग्याशी संबंधित काही त्रास झाला तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अधिकाधिक लोकांना संसर्ग होण्याची शक्‍यता असते. तसेच, पर्यटनाला जाण्यासाठी त्या क्षेत्रातील वैद्यकीय सुविधांची माहिती काढून ठेवणे, ही काळाची गरज झाली आहे. शहरासह देशात बरेच पर्यटनस्थळ आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी तसेच समुद्री भागातील पर्यटन टाळावे. 
- डॉ. संताजी कदम, माजी अध्यक्ष, जनरल प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशन 

अशी घ्या काळजी 

  • पर्यटनस्थळांची कोरोनाविषयक माहिती घ्यावी. 
  • गर्दीची ठिकाणे टाळावीत. 
  • सार्वजनिक वाहनांचा वापर कमी करावा. 
  • पर्यटनाला जाताना स्वतःची चादर, शॉलसारख्या वस्तू सोबत ठेवाव्यात
  • बाहेरचे पदार्थ शक्‍यतो टाळावे. 
  • पर्यावरणात विघटित होणाऱ्या वस्तूंचाच (लाकडी चमचा, प्लेट, ग्लास) वापर करावा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image
go to top