

Union Home Minister Amit Shah
esakal
Government Targets Networks Supporting Illegal Immigrants : देशभरातून नक्षलवादाचे यशस्वीपणे उच्चाटन केल्यानंतर,केंद्र सरकार आता अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या पुढील मोठ्या मोहिमेची म्हणजेच बेकायदेशीर घुसखोरांविरूद्धच्या व्यापक कारवाईची तयारी करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बेकायदेशीर स्थलांतरांची ओळख पटवणे, त्यांना परत पाठवणे आणि त्यांच्यासाठी आधारभूत ठरणाऱ्या यंत्रणेला (सपोर्ट इकोसिस्टम) नष्ट करणे यासाठी एक भक्कम रणनीती आखण्याकरिता उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे.