
नवी दिल्ली : भारताचा ७९वा स्वातंत्र्यदिन भारताबरोबरच जगामध्येही साजरा करण्यात आला. भारताच्या जगभरातील दूतावास आणि राजनैतिक कार्यालयांमध्ये ध्वजवंदन करण्यात आले. तसेच, विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. बीजिंगमध्ये झालेल्या सोहळ्याला चीनचे दोन उपमंत्री उपस्थित होते.