
चीनच्या जिआँगयीन बंदरातून हे जहाज बाहेर पडले असून, त्या जहाजावर हाँगकाँगचा झेंडा आहे.
अहमदाबाद (गुजरात) : चीनहून पाकिस्तानला जाणारे मालवाहू जहाज गुजरातच्या बंदरावर रोखण्यात आले आहे. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) या जहाजाची तपासणी करत आहे. चीनमधून बाहेर पडलेल्या या जहाजावर क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता असल्याचा संशय आहे. त्यापार्श्वभूमीवर भारताकडून जहाज रोखण्यात आलंय.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
भारताच्या सुरक्षेला धोका?
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या जिआँगयीन बंदरातून हे जहाज बाहेर पडले असून, त्या जहाजावर हाँगकाँगचा झेंडा आहे. भारताच्या संरक्षण खात्याला या जहाजा संदर्भात गुप्तचर यंत्रणेकडून माहिती मिळाली. त्यानंतर डीआरडीओने जहाजाची तपासणी करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. जहाजावरील ऑटोक्लेवचा वापर क्षेपणास्त्र डागण्यासाठी होऊ शकतो, त्यामुळंच या जहाजाची तपासणी करण्यात येत आहे. सध्या डीआरडीओची एक टीम जहाजावरील ऑटोक्लेवची तपासणी करत आहे. गुजरातमधील कंधला बंदरावर ही तपासणी सुरू आहे. या जहाजामुळं भारतभारताच्या सुरक्षेला धोका असल्याचा संशय आहे.
आणखी वाचा - जाणून घ्या पुणे स्टेशनमधून कोणत्या गाड्या झाल्या रद्द
भारताला संशय
चीन आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या करारानुसार चीन पाकिस्तानला 34 बॅलेस्टिक मिसाईल्स देणार आहे. या मिसाईल्समध्ये 500 किलो क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता असून, 300 किलोमीटवरील लक्ष्य भेदू शकते. या पार्श्वभूमीवर भारताला चीन आणि पाकिस्तान यांच्यात आण्विक देवाण-घेवाण होत असल्याचा भारताला संशय आहे. त्यामुळेच भारताकडून जहाजाची तापसणी करण्यात आलीय. पाकिस्ताननं उत्तर कोरियाकडूनही काही मिसाईल्स खरेदी केली आहेत. यात 12 ते 25 लिक्विड फ्युएल मिसाईल्सचा समावेश आहे.