esakal | भारत ही लोकशाहीची मातृभूमी - PM मोदी
sakal

बोलून बातमी शोधा

PM Modi

भारत ही लोकशाहीची मातृभूमी - PM मोदी

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : भारत ही लोकशाहीची मातृभूमी आहे. त्याचबरोबर लोकशाही आपल्यासाठी केवळ संविधानिक रचना नव्हे तर ती एक जीवनधारा आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. संसद टीव्हीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

मोदी म्हणाले, "आज आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस असून आजच संसद टिव्ही सुरु होणं हे अधिक संयुक्तिक आहे. जेव्हा हे लोकशाहीजवळ येऊन ठेपतं तेव्हा आपली जबाबदारी अधिक वाढते. भारताची भूमी ही लोकशाहीची मातृभूमी आहे. आपल्यासाठी लोकशाही हे केवळ संविधानिक रचना नव्हे तर तो एक आत्मा, जीवनधारा आहे"

हेही वाचा: टेलिकॉम क्षेत्रात मोठ्या सुधारणांना मंजुरी; Vodafone-Ideaला दिलासा

"अनेक वर्षांमध्ये माध्यमांची भूमिका बदलली असून त्यानी क्रांती केली आहे. कारण माध्यमं बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणं अत्याधुनिक होत गेली आहेत. संसद टीव्ही ओटीटी प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया पेज आणि अॅपही असावं अशा सूचना मी केल्या आहेत," असंही मोदी यावेळी म्हणाले.

यावेळी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू म्हणाले, "संसद ही लोकशाहीचं हृदय आहे. माध्यमं डोळे आणि कान आहेत. त्यामुळं संसदेच्या प्रकृतीची काळजी घेणं आपलं काम आहे"

loading image
go to top