ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यास भारत सज्ज मनसुख: मंडाविया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया
ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यास भारत सज्ज मनसुख: मंडाविया

ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यास भारत सज्ज मनसुख: मंडाविया

नवी दिल्ली : ‘‘कोरोनाच्या ओमिक्रॉन (omicron) या नव्या व्हेरियंटशी लढण्यास भारत(india) सज्ज आहे.’’ अशी ग्वाही केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया(central minister mansukh mandviya) यांनी आज राज्यसभेत(rajyasabha) दिली. ओमिक्रॉनवरील चर्चेला उत्तर देताना मंडाविया म्हणाले की, ‘‘ दुसऱ्या लाटेपासून केंद्रीय व राज्यांच्या यंत्रणांनी धडा घेऊन ऑक्सिजन प्रकल्पांसह विविध उपाययोजनांत भरीव वाढ केली आहे. त्यामुळे संभाव्य तिसरी लाट आलीच तरी तिला तोंड देण्यास सरकार सज्ज असेल.’’

हेही वाचा: निवडणूक कायदे (दुरुस्ती) विधेयक, २०२१ लोकसभेत मंजूर झाले; पाहा व्हिडिओ

ॲमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून महाराष्ट्र व दिल्लीत सर्वाधिक रुग्ण आढळत असल्याने केंद्राने राज्याच्या यंत्रणेबरोबर २४ तास संपर्क यंत्रणा सावध ठेवली आहे. देशातील ओमिक्रॉन रुग्णांची अधिकृत संख्या १६१ झाली त्यातील ४२ रुग्ण बरे झाले असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. या विषाणूमुळे देशात अद्याप कोणताही कोरोना रुग्ण गंभीर आजारी झालेला नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. ॲमिक्रॉनची रुग्णसंख्या पाहता केंद्राने बूस्टर लसीकरणास त्वरित सुरवात करावी अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केली. दिल्ली सरकारने सर्वच कोरोना पॉझिटिव्ह नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडाविया यांचे उत्तर सुरू असताना विरोधी पक्षांचे सदस्य गदारोळ करत होते त्यांना आरोग्यमंत्र्यांनी, कोरोनासारख्या विषयांवर तरी देश एक आहे असे जगासमोर जाऊ द्या, अशी विनंती केली.

हेही वाचा: मतदान ओळखपत्राला आधार जोडण्याचे विधेयक लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर

राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी संवाद

मंडाविया म्हणाले की, ‘‘ दक्षिण आफ्रिकेसह ज्या देशांत ओमिक्रॉनचा विस्फोट झाला आहे, अशा देशांना केंद्राने ‘धोका’ असणारे देश या गटात टाकले असून त्या देशांतून येणाऱ्यांना विलगीकरण सक्तीचे असेल. मी स्वतः राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा कली असून सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी तीनदा राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांकडे आजही किमान १७ टक्के लशी शिल्लक आहेत. ’’

Web Title: India Is Ready To Fight Against Omicronvarient Said Central Minister Mansukh Mandviya

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :New DelhiOmicron Variant